ओढ
जीव म्हणू की काळीज तुला
प्रश्न तसाच मनात आहे
बस प्रिये आयुष्यातला
श्वास माझा तुझ्यात आहे
जगत रहा तू खुशाल
तुला कशाची पर्वा कशाला
दुःख तुला कळणार नाही
ते असेल माझ्या वाट्याला
रुबाब तुझा माझ्या वरचा
हाच तर माझा माज आहे
राग तुझ्या डोळ्यातला
माझ्या जीवनाचा साज आहे
तुझी स्वप्न माझ्यासाठी
मी त्यांचा पाईक आहे
थोड्याच दिवसात काळजा तू
वर्दी मधला नाईक आहे
अरे तु नाराज तर मी शून्य
अर्थ तुझ्या हसण्यात आहे
ज्या दिवशी तुझ्यात अश्रू
दिवस माझ्या मरण्यात आहे
अलगद येता तुझी कुण कुण
मनाला माझ्या भीतीच असते
भास तुझा सभोवार
हीच माझी ओळख असते
किती जीव लावशील जगाला
स्वतःची जरा काळजी नसे
सुगंध फुलवत राहते सदैव
गुलाब जणू तुझ्यात वसे
स्वभाव तुझा दिलदार मिया
आस राहिल तुला पाहण्याची
आठवण काढत रहा जीवा
आतुरता असेल तुझ्या येण्याची
काय बोलू अन् किती बोलू
भावनेला कधीच अंत नसतो
बास आता एवढंच सांगेन
तुझ्याविना मी जिवंत नसतो
No comments:
Post a Comment